Your Needs, Our Services

लॉकर सुविधा
लॉकर सुविधा ही सभासदांसाठी एक सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा आहे. ही सुविधा नाममात्र भाड्यात उपलब्ध असून, सभासदांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.

RTGS/NEFT
जलद आणि सुरक्षितपणे पैसे हस्तांतरित करू शकतात. RTGS द्वारे मोठ्या रकमा तात्काळ पाठवता येतात, तर NEFT सुविधेमुळे छोट्या रकमा निश्चित वेळेनुसार हस्तांतरित केल्या जातात.

CBS प्रणाली
कोर बँकिंग सिस्टम (CBS) सुविधा मुळे कोणत्याही शाखांमधून खातेदारांना सेवा मिळू शकते. या प्रणालीच्या माध्यमातून, ग्राहक त्यांच्या खात्यांची माहिती, पैसे जमा किंवा काढणे, पासबुक अपडेट आणि इतर बँकिंग व्यवहार कोणत्याही शाखांमधून सहज करू शकतात.

लहान मुलांचे बचत खाते
पतसंस्थे मध्ये लहान मुलांसाठी विशेष बचत खाती सुरू करण्यात आलेली आहेत, ज्यामुळे मुलांना बचत करण्याची आवड लागते आणि आर्थिक शिस्त शिकायला मदत होते. त्यांना दैनंदिन रोख जमा करण्यासाठी पिग्मी बॉक्स मोफत दिले जाते.
या खात्यामुळे मुलांना छोट्या वयातच वित्तीय ज्ञान मिळवता येते आणि त्यांचा भविष्यकालीन आर्थिक विकास सक्षम होतो.
