top of page
2
1
3
4
Light - Item image 3.jpg

संस्थेविषयी

महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, जालनाची स्थापना दिनांक १९ फेब्रुवारी, १९९६ रोजी झालेली असुन संस्थेचा नोंदणी क्र. जेएएल/जेएएल/आरएसआर/सीआर-३४८/१९९५-९६ नुसार झाली आहे. संस्था स्थापनेपासुन आजपर्यंत संस्थेचा जालना जिल्ह्यातील एक अग्रणी व मार्गदर्शक पतसंस्था म्हणुन नावलौकिक आहे. तसेच समाजातील सर्व जनतेस, दुर्बल घटकास आर्थिक मदतीचा हात देण्याचे काम संस्थेने केले आहे.

संस्थेस आजपर्यंत लाभलेल्या सर्व संचालक मंडळ यांचे अथक प्रत्नाने या संस्थेने चांगला नावलौकिक मिळवलेला आहे. त्यासोबतच संस्थेच्या प्रशिक्षित व तत्पर सेवा देणारे कर्मचारी वर्ग संस्थेस लाभलेला आहे. त्यासोबतच सर्व  शाखांचे पालक संचालक व स्थानिक शाखा सल्लागार मंडळ यांचे मार्गदर्शन व शाखा वृद्धीसाठी विशेष केलेले विशेष प्रयत्नांनी आणि संस्थेचे कायदा सल्लागार, पॅनलवरील वकील, इंजिनियर, गोल्ड व्हॅल्युअर यांनी संस्थेच्या प्रत्यक्ष कामकाजात सहकार्याने संस्था आजही प्रगतीवर आहे. ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाची बँकिंग सुविधा देणे हे संस्थेचे आद्य कर्तव्य आहे.

 

सामाजिक उपक्रम म्हणुन संस्थेतर्फे  दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करणे, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धनासाठी झाडे सुरक्षा जाळी पुरवणे, इत्यादी बाबतीत संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे.

bottom of page